मनोरंजन

९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कैलास भामरे यांनी सादर केली कविता

९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कैलास भामरे यांनी सादर केली कविता

 

लासलगाव(वार्ताहर) समीर पठाण :
बडोदा येथे झालेल्या ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लासलगाव येथील कवी कैलास भामरे यांनी कविता सादर करून लासलगाव च्या नावलौकिकात भर घातली.
या साहित्य संमेलनात महाराष्ट्रातून अनेक छोट्या मोठ्या कवींनी हजेरी लावली होती
लासलगाव जिजामाता प्राथमिक शाळेत उपशिक्षक असलेले कवी कैलास भामरे सर यांनी लासलगाव विभागाचे नेतृत्व करून साहित्य संमेलनामध्ये शेतकरी जीवनावरील पाऊस न पडल्याने परमेश्वराला दिलेला आवाज “हाक” या आपल्या कवितेद्वारे सादर करुन उपस्थित असलेल्या प्रेक्षकांची मने जिंकली.
कैलास भामरे यांनी आपला परिचय देतांना लासलगाव येथील संस्थेचा उल्लेख करुन गौरवात भर घातली. कैलास भामरे यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील उपाध्यक्ष निवृत्ती भाऊ गायकर, संस्थेतील सर्व मुख्याध्यापक पर्यवेक्षक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,मित्रपरिवार यांनी अभिनंदन केले .

Show More

Related Articles

Back to top button
Close
Close