उल्हासनगर

पदभार स्वीकारताच सभापती अंजली साळवे यांची दमदार सुरुवात

प्रभाग समिती ४ च्या सभापती सौ अंजली चंद्रकांत साळवे यांनी घेतली अधिकाऱ्यांसोबत  स्वछता बैठक व डम्पिंग ग्राऊंडची पाहणी !!!

पदभार स्वीकारताच सभापती अंजली साळवे यांची दमदार सुरुवात

प्रभाग समिती ४ च्या सभापती सौ अंजली चंद्रकांत साळवे यांनी घेतली अधिकाऱ्यांसोबत  स्वछता बैठक व डम्पिंग ग्राऊंडची पाहणी !!!

उल्हासनगर , दिपक साठे : प्रभाग समिती ४ च्या सभापती पदभार स्वीकारताच प्रभाग समिती ४ च्या सभापती , काँग्रेस गटनेत्या सौ. अंजली साळवे यांनी त्यांच्या दालनात  प्रभाग ४ अधिकारी श्री तुषार सोनावणे, काँग्रेस महासचिव रोहित साळवे यांच्या समक्ष सर्व प्रभाग ४ अंतर्गत स्वच्छता निरीक्षकांची बैठक आयोजित केली ज्यामध्ये उपरोक्त विषयांवर चर्चा करून काही ठराव करण्यात आले .

१) नियमित कचरा कुंडी खत्ता येथील कचरा ठेकेदारा कडून उचलून घेणे व ठरलेल्या वेळेच्या आत कचरा न उचलल्यास ठेकेदारावर दंडात्मक कारवाही करणे.

२) प्रत्येक प्रभागात ओला कचरा व सुका कचरा विलगीकरण करून किमान एक कंपोस्ट पिट उभारणी करणे.

३) शहरात जागो जागी जमा होत असलेला डेब्रिस नियमित पने उचलून घेणे व डेब्रिस सार्वजनिक ठिकाणी फेकणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाही करणे.

४) महानगरपालिकेच्या मालकीचे जीर्ण झालेले शौचालय निष्कासित करून ताब्यात घेणे.

५) डम्पिंग ग्राउंड येथील नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता नियमित तिथे बदबूनाशक रसायन फवारणी करणे तसेच मेलेले जनावर त्या ठिकाणी तेथे डंप करणे प्रतिबंधक करणे.

सदर बैठक संपन्न झाल्यावर सभापती महोदया यांनी उल्हासनगर कॅम्प ५ येथील डम्पिंग ग्राऊंडची सर्व अधिकार्यां सोबत समक्ष पाहणी केली व तिथल्या समस्या जाणून घेतल्या.
वरील सर्व विषयांवर आयुक्त व संबंधित विभागांशी पाठपुरावा करून अंमलबाजवणी करणार असे आश्वासन सभापती यांनी या वेळेस दिले.

Google Ad
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close