Breaking Newsअंबरनाथक्राइम

अंबरनाथ प्राचीन मंदिरांची नगरी की अवैध धंद्याचे माहेरघर ?????

अंबरनाथ प्राचीन मंदिरांची नगरी की अवैध धंद्याचे माहेरघर ?????

अंबरनाथ ( हेरिसन डिमेलो ) : अंबरनाथ शहर हे ऐके काळी प्राचीन शिवमंदिराचे शहर म्हणून प्रसिद्ध होते पण आता ती ओळख काही समाजकंटकांनी पुसली आहे व अंबरनाथ ची पवित्र भुमी ही आता फक्त सर्व प्रकारच्या अवैध धंद्याची भुमी झाली आहे हे सिद्ध केले आहे  एसबीटी न्युजचे संपादक हेरिसन डिमेलो यांनी आज केलेल्या स्टिंग ऑपरेशन ने .

 

समाज माध्यमातून वायरल होत असलेल्या व्हिडीओ मध्ये स्पष्ट दिसत आहे की कशा प्रकारे हे समाजकंटक पोलीस प्रशासनाची अजिबात भिती न बाळगता बिंधास्त पणे जुगार अड्डे चालवत आहेत व ह्या अड्ड्यावर  रम्मी , मटका , पिंग-पोंग , पताडा , आसरा , चकरी , इत्यादी जुगार चालवत आहेत .

सदर व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की जुगार चालवणारे व जुगार खेळायला येणाऱ्या लोकात कोरोना रोगाची बिलकुल भिती नाहीये व ते कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर पाळत नाहीत तसेच मास्क ही घालत नाहीत तसेच गुटखा व तंबाखू खाणारे कुठेही थुंकून रोगाला आमंत्रित करताना दिसत आहेत . पैसे कमावण्याचा व जुगार खेळण्याच्या नादात हे लोक कोरोना ला खतपाणी घालत आहेत व पोलीस प्रशासन फक्त बघ्यांची भुमिकेत आहेत .

महाराष्ट्र तेज न्युजच्या टिमने व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या ठिकाणी म्हणजेच बांगडी गल्लीत , स्टेशन परिसरातील पार्किंगच्या बाजूला तसेच वंदना टॉकीज रोडवरील मंदिराच्या परिसरात जाऊन शहानिशा केली असता ह्या व्हिडीओ ची सत्यता दिसून आली , खरोखरच तिथे खुप मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असून कोरोनाचे मार्गदर्शक नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले . सर्व प्रकार बघून महाराष्ट्र तेज न्युज चे संपादक श्री. श्यामभाऊ जांबोलीकर यांनी त्वरीत अंबरनाथ चे एसीपी श्री. विनायक नरळे सरांना फोन करून माहिती दिली असता एसीपी साहेबांनी त्वरीत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे .

तसेच एसबीटी न्युजच्या संपादकांनी सदरहू माहिती मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य , मा.पोलीस महासंचालक सो महाराष्ट्र , मा.पोलीस आयुक्त सो ठाणे शहर , मा. तहसीलदार अंबरनाथ , मा.पोलीस उपायुक्त सो. झोन -४ , मा.सहाय्यक पोलीस आयुक्त अंबरनाथ , व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो अंबरनाथ पोलीस स्टेशन यांना माहितीसाठी व कठोर कारवाई करण्यासाठी पाठवले आहे .

Google Ad
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close