पुणे

द वॉटर फाऊंडेशन संस्थेला पुण्यातील जागृती प्रतिष्ठान तर्फे योद्धा 2020 पुरस्कार प्रदान

द वॉटर फाऊंडेशन संस्थेला पुण्यातील जागृती प्रतिष्ठान तर्फे योद्धा 2020 पुरस्कार प्रदान

उल्हासनगर , दिपक साठे : द वॉटर फाऊंडेशन संस्थेला पुण्याच्या जागृति प्रतिष्ठानतर्फे योद्धा 2020 या सन्मानाने गौरविण्यात आले , यात संस्थेचे संस्थापक पंकज गुरव यांना डॉ राजेंद्र सिंह वॉटर मन ऑफ इंडिया यांच्या हस्ते ठाणे जलनायक या सन्मानाने गौरविण्यात आले होते. शहारातील लोकांना स्वच्छ पाणी कसे मिळेल याची थोडक्यात माहिती पंकज गुरव यांनी दिली .

 

बदलापुर येथील सौ संगीताताई गुरव यांना पण गौरवण्यात आला त्यांना महाराष्ट्रात वैक्स क्वीन असे संबोधले जाते. या महामारी च्या काळात पण त्यांनी महिलांना सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी आकर्षित मेणबत्ती बनविन्याचे प्रशिक्षण दिले याच मुळे त्यांच्या सत्कार करण्यात आला .
दोन पुरस्कार एकाच घरी आल्याने गुरव परिवार यांच्यात अणि द वॉटर फाऊंडेशन या संस्थेच्या सर्व सभासदां मध्ये आनंद व्यक्त केला जात आहे .
ही दिवाळी सर्व नागरिकांचे भविष्य उज्ज्वल व प्रकाशमान करो व या महामारी वर मात करण्याची शक्ति मिळो हीच देवा चरणी प्रार्थना अशा शुभेच्छा श्री. पंकज गुरव यांनी दिल्या .

Google Ad
Tags
Back to top button
Close
Close