आरोग्य विशेष

डॉ. निता पाटील फाऊंडेशनच्या वतीने सवलतीच्या दरात कोविड 19 (कोरोना) टेस्ट अभियान

डॉ. निता पाटील फाऊंडेशनच्या वतीने सवलतीच्या दरात कोविड 19 (कोरोना) टेस्ट अभियान.

शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी धोरणांतर्गत गरजूंना लाभ घेण्याचे आवाहन.
आय.सी.एम.आर. नोंदणीकृत लॅबद्वारे टेस्ट रिपोर्ट. अँटिजेंन आणि एंटिबॉडीज टेस्टची सुद्धा सोय.

 

कल्याण , ( गुुरुुुुनाथ तिरपनकर ) : सर्व जगामध्ये कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यातल्या त्यात आपल्या देशात आणि महत्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिलासादायक चित्र तयार होत आहे.
राज्य सरकार आणि प्रशासन यांच्या अथक परिश्रमाने, जनजागृतीने आणि राज्यातील जनतेच्या सहकार्यामुळे आपल्या राज्यात खूप दिलासादायक परिस्थीती आहे. या सर्व महामारीच्या काळात पत्रकार, मिडिया, प्रशासन, पोलीस आणि आरोग्य यंत्रणा, सामान्य प्रशासन, आरोग्य आणि सफाई कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांनी आपला मोलाचा सहभाग नोंदवला आहे.
सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक आरोग्य उपक्रम अंतर्गत डॉ. निता पाटील फाऊंडेशनच्या वतीने कल्याण तालुक्यातील सर्व उपनगरातील नागरिकांसाठी अल्प दरात नामांकित लॅबद्वारे कोविड 19 ची चाचणी करून देण्याचे आवाहन केले आहे. याचसोबत अँटिजेंन आणि अँटीबॉडीज टेस्ट सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ. निता पाटील आणि उपाध्यक्ष डॉ. अमितकुमार गोईलकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही महिती दिली आहे.
कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, टिटवाळा, शहाड, आंबिवली आणि परिसरातील नागरिकांनी गरजेनुसार या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्यांना कुणाला ही टेस्ट करायची असेल त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा. त्यानुसार लॅब टेक्निशियन संबंधितांच्या घरी येऊन स्वेब सॅम्पल घेतील आणि त्याच दिवशी संध्याकाळी रिपोर्ट उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले आहे.
गरजू नागरिकांनी 9594483807 किंवा 9867258725 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Google Ad
Tags
Back to top button
Close
Close