नाशिकमराठा आरक्षण

मराठा मोर्चा समन्वयकांच्या भेटीबाबतच्या चुकीच्या बातम्या पसरवू नये – छगन भुजबळ

मराठा मोर्चा समन्वयकांच्या भेटीबाबतच्या चुकीच्या बातम्या पसरवू नये – छगन भुजबळ

नाशिक , प्रतिनिधी : त्र्यंबकेश्वर येथे आज शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने नाशिक बाजार समितीच्या अंतर्गत नव्याने सुरु होत त्र्यंबकेश्वर उपबाजार कार्यालय व विविध विकासकामांचा भूमिपूजन कार्यक्रम सकाळी ११ वाजता नियोजित केलेला होता. त्यानंतर त्र्यंबकेश्वर येथेच इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोरोना सद्यस्थितीबाबत शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या समवेत आढावा बैठक दुपारी ११.३० वाजता आयोजित करण्यात आलेली होती. दोनीही कार्यक्रम पूर्वनियोजित व अत्यावश्यक होते. याबाबत मराठा मोर्चा समन्वयकांना पूर्वकल्पना दिलेली होती. त्या अनुषंगाने दुपारी १.३० वाजता समन्वयकांच्या मान्यतेने भेटण्याची वेळ देखील निश्चित करण्यात आली होती. तथापि दोन्ही कार्यक्रम आटोपून कार्यालयात मराठा मोर्चा समन्वयकांना भेटण्यासाठी वेळेत पोहचून देखिल त्याआधीच मोर्चेकरी गेटवर निवेदन ठेवून निघून गेले. तरी देखील छगन भुजबळ यांनी मुद्दामून मोर्चेकऱ्याची भेट टाळली असल्याच्या बातम्या पसरविल्या जात असून अशा आशयाच्या चुकीच्या बातम्या पसरवू नये असे आवाहन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

 

याबाबत छगन भुजबळ यांनी पुढे म्हटले आहे की, गेल्या पंधरा दिवसांपासून त्र्यंबकेश्वर येथील कार्यक्रम हे नियोजित होते. त्यामध्ये सकाळी ११ वाजता नाशिक बाजार समितीच्या उपबाजार आवार त्र्यंबकेश्वर येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन व त्यानंतर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या संदर्भात जिल्हाधिकारी व इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अधिकारी यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत मराठा मोर्चा समन्वयक पदाधिकाऱ्यांना कार्यालयाचे वतीने कळविण्यात आले होते. त्यांना भेटण्यासाठी दुपारी १.३० वाजेची वेळ देखील कळविण्यात आली होती. तसेच समन्वयकांशी सातत्याने संपर्क देखील सुरु होता. त्र्यंबकेश्वर येथील आढावा बैठक संपल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी कळविण्यात देखील आले होते. त्यानंतर देखील मराठा मोर्चा समन्वयक न भेटताच परत निघून गेले. आपल्या कार्यालयाने संपर्क करून देखील मोर्चा समन्वयक का थांबले नाही असा सवाल देखील भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.

त्यांनी पुढे म्हटले आहे की, ज्या ज्या वेळी विधानसभेत मराठा आरक्षणाबाबत प्रश्न उपस्थित झाला त्यावेळी आपण नेहमीच पाठिंबा दिला आहे. याबाबत आपण कुठलाही विरोध कधी केलेला नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची केवळ माझी नाही तर माझ्यापक्षासह इतर सर्व पक्षांची भूमिका आहे. मात्र नेहमीच कुठल्या तरी कारणांनी माझ्याविषयी राजकारण करून समाजात विष पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे हे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच अद्यापही मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आपली भेट घेण्यासाठी येणार असतील तर त्यांचे स्वागतच असून याबाबत कारण नसतांना कुणीही चुकीची माहिती पसरवून नये असे त्यांनी म्हटले आहे.

Google Ad
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close