वर्धा

अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाचे विदर्भ मिडीया प्रभारी पदी प्रभाकर कोळसे यांची निवड

अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाचे विदर्भ मिडीया प्रभारी पदी प्रभाकर कोळसे यांची निवड


नंदोरी : राज्यातील योग शिक्षकाचे कार्याचा गौरव होउन योगाचे प्रसारासाठी कार्यरत योग शिक्षकांना उचीत न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ प्रयत्नरत आहे . अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाचे विदर्भ मिडीया प्रभारी पदी पत्रकार प्रभाकर कोळसे यांची निवड राष्ट्रीय संयोजक योग गुरू मंगेश त्रिवेदी, महाराष्ट्र राज्य प्रभारी डॉ.मनोज निलपवार, महाराष्ट्र राज्य मिडीया प्रभारी दिलीप ठाकरे यांनी केली आहे.

 

पत्रकार  प्रभाकर कोळसे सेवानिवृत्त प्राचार्य असुन विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आहे.

प्रभाकर कोळसे यांची अखिल भारतीय योग शिक्षक महासंघाचे विदर्भ मिडीया प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल महासंघाचे राज्य मिडीया प्रभारी दिलीप ठाकरे, महासंघाचे राज्य प्रभारी डॉ मनोज निलपवार, संत तुकडोजी पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चाफले , पत्रकार रमेश लोंढे, समुद्रपुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकर धोटे, माजी प्राचार्य लक्ष्मण तेजणे  आदींनी अभिनंदन केले आहे.

Google Ad
Tags
Back to top button
Close
Close