नांदेड

दिव्यांग बांधवाना सुसह्य जीवन जगण्यासाठी न्याय हक्क द्या नसेल तर स्वेच्छा मरणाची परवानगी -चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर

दिव्यांग बांधवाना सुसह्य जीवन जगण्यासाठी न्याय हक्क द्या नसेल तर स्वेच्छा मरणाची परवानगी -चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर

नांदेड : दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली व अनेक संघटनेच्या वतीने नांदेड जिल्ह्यात अनेक आंदोलन करून दिव्यांगाना न्याय हक्क मिळत नसल्याने जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांच्या मार्फत मा. पंतप्रधान साहेब संसद भवन नवी दिल्ली , मा. मुख्यमंत्री साहेब मंञालय मुंबई , मा. सामाजिक न्याय मंञी मंञालय मुबई , मा बच्चू भाऊ कडु राज्यमंत्री मुंबई , मा सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री नांदेड , मा. दिव्यांग आयुक्त साहेब पुणे , मा. विभागीय आयुक्त साहेब ओरंगाबाद ईत्यादी मंञी व प्रशासकीय अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिव्यांग बांधवांना त्यांना सुसह्य जीवन जगण्यासाठी हक्क व न्याय द्या नसेल तर दिव्यांगाना स्वेच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत दि २४ जाने २०२१ पासुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो च्या संख्येने बेमुदत धरणे आंदोलन करित असल्याचे निवेदनाद्वारे दिला ईशारा.

दिव्यांग बांधवांना सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगता यावे म्हणून शासन दिव्यांग कायदा २०१६ ला करून व न्यायालय दरवेळी शासन प्रशासन यांना खडसाऊन सुध्दा कुंभकर्ण प्रशासन जागे करण्यासाठी ज्या दिव्यांगांना चालता येत नाही , दिसत नाही , ऐकू येत नाही अशा दिव्यांगानी अनेक आंदोलने केल्यानंतर वरिष्ठ अधिकारी अनेक लेखी आदेश व वेळापञक कनिष्ठ अधिकारी यांना देऊन व आंदोलन कर्त्याना एका महिन्यात आपले प्रश्न सोडविण्यासाठी व जे कर्मचारी दिव्यांगाच्या कामात दिरंगाई करतील त्यांना शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे लेखी आश्वासन देऊन वारंवार आश्वासन व वरिष्ठ अधिकारी यांनी कनिष्ठ अधिकारी यांना पस्तीस लेखी पञ व वारंवार मिटिंग मध्ये आदेश देऊनही दिव्यांगांना हक्काच्या सवलतीपासुन वंचित ठेवणाऱ्या किती अधिकारी यांच्यावर वरिष्ठ अधिकार्यांनी कार्यवाही केली ?

सार्वजनिक बांधकाम मंञी व पालकमंत्री व जिल्हाधिकारी नांदेड यांनी

१) दिव्यांग मित्र एप नांदेड ची निर्मिती करून त्या अँपचे उदघाटन करून वेळापञक ठरवून दिले पण सात महिन्यात साधी दिव्यांगाची यादी तयार झाली नाही, दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या अनेक योजना समाज कल्याण विभागाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व सुविधा दिव्यांगाला घरपोच मिळण्या करीता दिव्यांग मित्र एप नांदेड ची निर्मिती नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री व माजी जिल्हाधिकारी नांदेड यांनी केली व एकही दिव्यांग वंचित राहू नये वेळेचे बंधन वेळापञक १४जुलै ते ३१ जुलै २०२० पर्यंत नाव नोंदणी व दि .१ आँगस्ट ते १० आँगस्ट २० पर्यंत छाननी व १५ आँगस्ट २० ला लाभ देण्याचे लेखी आदेश देऊन सुध्दा सात ते आठ महिन्यात या एप  मध्ये यादी जाहीर झाली नाही जिल्हाधिकारी यांचे आदेश न पाळणाऱ्या , दिव्यागांना हक्कापासुन वंचित ठेवणाऱ्या अधिकार्यांवर योग्य ती कारवाई करण्यात आली काय ?

दिव्यांग साहित्य व पायाभूत साधने मोजमाप शिबीर नांदेड  जिल्ह्यातील डिसेंबर 2019 मध्ये दिव्यांगांना हात, पाय, तिनचाकी सायकल व्हिलचर, वॉकर, काठ्या, कुबड्या ईत्यादी दिव्यांगासाठी पायाभूत साधने व साहित्य मोजमाप तर वयोश्री शिबीराचे आयोजन करून वयोवृद्धांना , चष्मा, वापर, दाताची कवडी, व्हीलचेअर ईत्यादी साधने देण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सोळाही तालुक्यात शिबिर आयोजित करून लाखो रुपये दिव्यांग राखीव निधीतून खर्च करण्यात आले होते. पण ज्यांचे मोजमाप घेऊन तेरा महिने झाले तो मापाचे साहित्य आता जुळले काय? आपणास साहित्य मिळेल या आशेने पडत झडत आलेला दिव्यांग वृध्द यांना आज पर्यंत एक हि पायाभूत साधने व साहित्य मिळाले नाही.व शिबिराचे श्रेय लागणारे नेते व प्रशासकीय अधिकारी यांना दिव्यांग साहित्याची का आठवण येत नाही आठवण दिव्यांगानी दिली तर का दुर्लक्ष केले जाते.

नेते मंञी प्रशासकीय अधिकारी यांना जसे हक्क मिळतात तसे हक्क दिव्यांग वृध्द यांना मिळत नसल्यास कुञ्यासारखे जीवन जगण्यापेक्षा आम्हा दिव्यांगाना मानसन्मानाने स्वेच्छा मरण्याची आम्ही मताच्या शक्तीने सतेत पाठविलेले मंञी, प्रशासकीय अधिकारी यांनी देऊन या खडतर दिव्यांग जन्मातुन मुक्त करावे असे निवेदन दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे जी, अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले, राजुभाऊ शेरकुरवार, गजानन हंबर्डे, संतोष नरवाडे, सविता नांवदे,सुभद्राबाई शिंदे, दिनेश ऊपे, गणेश भास्करे, बाबुराव वानोळे, महानंदा गाडे, संदीप झगडे, ईत्यादी कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे दिले.

Google Ad
Tags
Back to top button
Close
Close