उल्हासनगर

उल्हासनगर मनसेत जोरदार इनकमिंग  सुरुच

उल्हासनगर मनसेत जोरदार इनकमिंग  सुरुच

उल्हासनगर-५ येथील अनेक तरुणांनी केला मनसेत जाहीर प्रवेश…..

उल्हासनगर , शरद घुडे : उल्हासनगर  शहरातील प्रस्थापित आजी-माजी सत्ताधारी पक्षांच्या निष्क्रिय कार्यपद्धतीला कंटाळून महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच मनसे नेते आणि आमदार माननिय श्री राजु (दादा) पाटील ,आणि ठाणे, पालघर जिल्हा अध्यक्ष मा.अविनाश जाधव  यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच  उपशहर अध्यक्ष शैलेश पांडव  यांच्या नेतृत्वाखाली आज उल्हासनगर-५  येथील प्रभाग क्रमांक १७ येथील अनेक तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.
आणि यापुढे प्रभाग क्रमांक १७ मधील शेवटच्या घटकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून समाजकार्य सुरू करणार असल्याचा  या नव-युवकांनी यावेळी निर्धार केला.
जिल्हा अध्यक्ष सचिन कदम,उप-जिल्हा अध्यक्ष प्रदीप गोडसे,शहर संघटक मैनुद्दीन शेख,वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात,उप शहर अध्यक्ष शैलेश पांडव तसेच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Google Ad
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close