उल्हासनगर

मनसे मध्ये इनकमिंग जोरात सुरूच

उल्हासनगर मधील विविध पक्षांतील तरुणांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश....

मनसे मध्ये इनकमिंग जोरात सुरूच

उल्हासनगर मधील विविध पक्षांतील तरुणांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश….


उल्हासनगर, शरद घुडे : महाराष्ट्राचा बुलंद आवाज, तरुणांचे प्रेरणास्थान  माननीय राज साहेब ठाकरे  यांच्या विचारांनी प्रेरित होऊन मनसे नेते, आमदार  मा.श्री राजू दादा पाटील साहेब  व ठाणे- पालघर जिल्हा अध्यक्ष मा.अविनाश जाधव साहेब  यांच्या मार्गदर्शनाखाली  उल्हासनगर मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन भाई शेख  यांच्या नेतृत्वात तसेच  उप-जिल्हा सचिव श्री संजय घुगे, शहर सह-सचिव प्रवीण माळवे, वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात, विभाग अध्यक्ष अक्षय धोत्रे, बादशहा शेख, उप-विभाग अध्यक्ष जाफर शेख,  शुभम कांबळे  यांच्या प्रमुख उपस्थितीत उल्हासनगर-२ येथील गांधी नगर, गरीब नगर, बाल्कन-जी-बारी परिसरातील शिव-सेना, आर.पी.आय. तसेच विविध पक्षातील तरुणांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.

यावेळी  संतोष सूर्यभान खत्रे, मुकेश रतन कांबळे  यांच्या पुढाकाराने विजय भालेराव, राहुल दणके, आकाश कांबळे, राहुल कुचेकर, राजू खत्रे, निलेश भालेराव, कार्ति कांबळे, दीपक,सागर, रवी, आकाश, धर्मेश, सचिन, दीपक आवारे तसेच परिसरातील अनेक तरुण आणि नागरिक आज मनसेत सामील झाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सतत चालू असलेल्या समाजिक कार्याने प्रेरणा घेत व मा.राज ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव पडला असल्याने मनसेत प्रवेश करत असल्याचे मत नवीन प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले .

Google Ad
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close