नाशिकमराठा आरक्षण

मराठा समाजाच्या भावनांना ना.भुजबळांनी दाखवली पाठ : मराठा क्रांती मोर्चा संतप्तः राजीनाम्याची केली मागणी

मराठा समाजाच्या भावनांना ना.भुजबळांनी दाखवली पाठ : मराठा क्रांती मोर्चा संतप्तः राजीनाम्याची केली मागणी

 

नाशिक/प्रतिनिधी
मराठा आरक्षण स्थगितीच्या मुद्यावर सकल मराठा समाजाच्या भावनांना डावलून पालकमंञी ना.छगन भुजबळ यांनी समन्वयकांना भेट नाकारल्यानं जिल्ह्यात समाजबांधवांमध्ये तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी नियोजीत कार्यक्रमानुसार ना.छगन भुजबळ यांचे निवासस्थान असलेल्या नवीन नाशिकमधील भुजबळ फार्मवर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनासाठी समन्वयक भुजबळ फार्मवर पोहचल्यानंतर ना.भुजबळ हे ञंबकेश्वर येथे कार्यक्रमासाठी गेल्याचे समजल्याने समन्वयकांमध्ये संतापाची लाट उसळली. महाविकास विकास आघाडीच्या निषेधासह मराठा आरक्षणाचा हक्क मिळवण्याच्या बाजूने घोषणाबाजी करण्यात आली
मराठा आरक्षण प्रश्नी येत्या दोन दिवसात राज्याचे मुख्यमंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष यांना विशेष अधिवेशन व आरक्षण प्रश्नी पुनर्रयाचिका दाखल करण्यासाठी पत्र देण्याबाबत ना.छगन भुजबळ यांनी महत्वाची भुमिका बजवावी हा आग्रह धरण्यासाठी हे ठिय्या आंदोलन होते. माञ या शांततेच्या मार्गावर सुरू असलेल्या आंदोलनाकडे पालकमंञ्यांनी पाठ फिरवल्याने समाजात तिव्र नाराजी व्यक्त होत आहे, भुजबळ यांच्या करणीकथनीतला फरक अधोरेखीत करणारी ही घटना असल्याच्याही प्रतिक्रीया समाजातून येत आहेत. दरम्यान ञंबकेश्वरचा कार्यक्रम पुर्वनियोजीत होता, तसेच क्रांती मोर्चाच्या आंदोलानाविषयी पुर्ववकल्पना नव्हती हा काही माध्यमांवर केलेला भुजबळांचा खुलासाही मखलाशी असल्याच्या भावना क्रांती मोर्चाने व्यक्त केल्यात.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण प्रश्नी स्थगितीचा निर्णय दिला. यासाठी कोण जबाबदार, कोणी काय केले यावर आता चर्चा नको.
आता भविष्यातील मराठा आरक्षणाची परिस्थिती बघता याची जबाबदारी सर्व आमदार खासदार यांनी घ्यावी.
गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा लढा असून आज पर्यंत काही आमदार खासदार सोडले तर अन्य कुणी आरक्षण प्रश्नी सभागृहात प्रश्न किंवा आवाज उठविलेला नाही.
लोकप्रतिनिधी ज्या मतदार संघातून निवडून येतात मग तो खुला असो वा राखीव मराठा समाज कुठलाही भेदभाव न करता आपल्याला भरघोस मतांनी निवडून देत सभागृहात पाठवितात परंतु निवडणूक झाल्या नंतर पक्ष्याची बांधिलकी जपत आपण मराठा समाजाच्या न्यायिक मागण्यांसाठी आवाज उठविण्यात कुठे तरी कमी पडत आहेत याची जाणीव करून घ्यावी व आत्मचिंतन करावे.अशी मराठा क्रांती मोर्चाची भुमिका आहे.
ही भुमिका समजून घेण्याऐवजी ना.भुजबळांनी क्रांती मोर्चाकडे पाठ फिरवल्याने भुजबळांच्या हेतूवर संशय व्यक्त करून ठिय्या आंदोलनात संतप्त घोषणाजी करण्यात आली.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर गणेश कदम तुषार जगताप राजू देसले शरद तुंगार प्रमोद जाधव शिवाजी मोरे आशिष हिरे शिवा तेलंग बंटी भागवत सचिन पवार विलास जाधव उमेश शिंदे निलेश मोरे मधुकर कासार ज्ञानेश्वर थोरात किरण पानकर विजय खर्जुल संजय चुंबळे महेश आहेर विजय उगले नितीन दातीर संजय फडोळ तुषार भोसले ज्ञानेश्वर भोसले अनिल ढिकले निलेश गायके शिवा गुंजाळ तानाजी गायकर सदानंद नवले किरण बोरसे शुभम देशमुख योगेश गांगुर्डे पुंडलिक बोडके जितू उगले प्रसाद जाधव सचिन जाधव अर्जुन शिरसाठ सुभाष गायकर सागर पवार वैभव दळवी माधवी पाटील सुजाता देशमुख प्रथमेश पिंगळे रोहित गोसावी श्याम फर्नांडिस दादा शिंदे कुंदन हिरे मनोहर मुसळे राजेश लांडगे मयूर शिंदे  आदी समन्वयक या ठिय्या आंदोलनात सहभागी झाले होते.

लक्षवेधी :
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठ्यांना मिळालेला आरक्षण टीकवण्यासाठी लोकप्रतिनिधिंनी विशेष महाअधिवेशन बोलवावं यासाठी मराठा समाज आग्रही आहे.

👉 नाशिक जिल्ह्यातील खासदार, आमदारांच्या घरी जाऊन केंद्र आणि राज्य सरकारला खुले पत्र द्यावे मागणीवर ठाम.

👉 नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवास्थानी मराठी क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी गेले होते. मात्र भुजबळ हे त्रंबकेश्वर इथं नियोजित कार्यक्रमासाठी गेल्याने समाज बांधवांच्या संतापात आणखी भर पडली.

👉 छगन भुजबळ यांच्या विरोधात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली असून राजीनाम्याची मागणी केली आहे.

🧐 भुजबळांचा मराठा क्रांती मोर्चाकडून जाहीर निषेध;

👉 निवेदन देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा येणार होता हे माहीत असून सुद्धा बराच वेळ झाला तरी भुजबळ न आल्याने त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करत त्यांच्या बंगल्याच्या प्रवेशद्वारावर निवेदन चिटकवल्याता करण गायकर यांचा दावा.

👉 जर नाशिकचे पालकमंत्री बदलले  नाही तर मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जा असा शरद पवार यांना इशारा.
भुजबळांना आमची गरज नसेल तर आम्हालाही भुजबळांची गरज नाही असा रोष आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

👉  सकल मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्ते येणार आहे असं कळवले नव्हते, मला माहिती झाल्यावर ठराविक वेळेत माझे पूर्व नियोजित कर्मक्रम असल्याने मी त्रंबकेश्वरला गेलो होतो, असं सांगत कधीच आरक्षणाला विरोध केला नसून उलट सभागृहात पाठिंबा दिल्याचं भुजबळांनी सांगितले असले तरी ना.भुजबळ यांना ञंबकेश्वरच्या कार्यक्रमाचे अधिकृत निमंञण नव्हते.ना.भुजबळ ना.नरहरी झिरवाळ यांना घेऊन ञंबकेश्वरच्या कार्यक्रमाला अचानक आल्याचा खुलासा एका वक्त्यानेच कार्यक्रमात जाहीरपणे केला आहे.यावरून भुजबळांची पोटात एक ओठात दुसरे अशी द्विनिती उघड झाली आहे.

Google Ad
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close