उल्हासनगर

मनसे तर्फे खरे कोरोना योद्धे असलेले स्वच्छता कर्मचारी यांचा दिवाळी निमित्त भेटवस्तू देऊन सम्मान

मनसे तर्फे खरे कोरोना योद्धे असलेले स्वच्छता कर्मचारी यांचा दिवाळी निमित्त भेटवस्तू देऊन सम्मान……

कोरोनाच्या या महाभयंकर काळात सर्वत्र जनजीवन अस्त व्यस्त झालेलं असतांना, सर्व व्यवहार आणि सर्वच काही बंद पडलेले असतांना फक्त एक विभाग शहरात सर्वत्र कार्यरत होता आणि जनसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी आपली कामगिरी चोख बजावत होता,तो म्हणजे उल्हासनगर महानगर पालिकेचा “स्वच्छता विभाग”, आणि  “स्वच्छता कर्मचारी”  हेच माझ्या मते खरे  “कोरोना योद्धे”  आहेत असे मैनुद्दीन शेख यांनी सांगितले. याच अनुषंगाने प्रभाग १ येथील उल्हासनगर महानगर पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा दिवाळीच्या सणानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांच्या तर्फे भेटवस्तू देऊन त्यांचा सम्मान करण्यात आला.

यावेळी मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख, शहर सचिव शालीग्राम सोनवणे, वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात, विभाग अध्यक्ष कैलास वाघ, तसेच प्रभागातील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close