मनसेच्या ईशाऱ्यानंतर महापालिका प्रशासनाला आली जाग….

मनसेच्या ईशाऱ्यानंतर महापालिका प्रशासनाला आली जाग….
तात्काळ रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लावण्याच्या महापालिकेच्या आश्वासनानंतर मनसेचे उपोषण मागे…
उल्हासनगर, शरद घुडे : अमरधाम चौक (आंबेडकर चौक) – रोहिदास चौक ते रमाबाई आंबेडकर नगर प्रवेशद्वार पर्यंत च्या रस्त्याची,फुटलेल्या जलवाहिन्यांची, तुटलेल्या गटारींची तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी महापालिकेच्या निष्क्रिय प्रशासनाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष श्री काळू थोरात यांनी महापालिका प्रशासनाला दिनांक २५/११/२०२० रोजी अमरधाम चौकात आमरण उपोषणाचा ईशारा दिल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी लवकरात लवकर फुटलेल्या जुन्या जलवाहिन्यांची दुरुस्ती सुरू करून तात्काळ रस्त्याच्या कामाला सुरुवात करणार असल्याचे लेखी आश्वासन श्री काळू थोरात यांना दिलेले आहे आणि पोलीस अधिकाऱ्यांनी ही कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर श्री थोरात यांची समजूत काढून त्यांना उपोषण न करण्यासाठी अग्रह केल्यामुळे आणि सध्या महापालिका प्रशासनाने फुटलेल्या जलवाहिन्या दुरुस्तीचे काम सुरू केल्याने श्री थोरात यांनी तूर्तास उपोषण मागे घेतले आहे परंतु पत्रात दिलेल्या कालावधीमध्ये रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास पुढील आंदोलन हे आयुक्तांच्या दालनासमोर करणार असल्याचा ईशारा श्री काळू थोरात यांनी महापालिका प्रशासनाला दिलेला आहे.
तसेच आज त्या परिसरात जाऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत नादुरुस्त रस्त्याची आणि तुटलेल्या जलवाहिन्यांची व सुरू असलेल्या कामाची पाहणी ही केली.
यावेळी मनसेचे उप-जिल्हा सचिव संजय घुगे, शहर संघटक मैनुद्दीन भाई शेख, सह-सचिब प्रवीण माळवे, उप-शहर अध्यक्ष मुकेश सेठपलानी, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात, विभाग अध्यक्ष बादशहा शेख, अक्षय धोत्रे, उप-विभाग अध्यक्ष विष्णू जाधव, शाखा अध्यक्ष मॅक्स लोखंडे, मुकेश कांबळे तसेच मनसेचे प्रभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.