उल्हासनगर

महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना दिवाळीपूर्वी दिव्यांग निधी मिळालाच पाहिजे – मनसे

उल्हासनगर महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना दिवाळीपूर्वी दिव्यांग निधी मिळालाच पाहिजे – मनसे

उल्हासनगर  : उल्हासनगर  महानगर पालिकेच्या कार्यक्षेत्रात जवळपास १२०० दिव्यांग व्यक्ती राहतात, महाराष्ट्र शासनाच्या २०१८ च्या शासन नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे एकूण अर्थसंकल्पाच्या ५ टक्के निधी हा दिव्यांग व्यक्तींना अनुदान करण्यात यावेत असे आदेश आहेत, उल्हासनगर महानगर पालिकेतर्फ़े  ही या आदेशाचे पालन करून शहरातील १२०० दिव्यांग व्यक्तींना दरवर्षी प्रति व्यक्ती १२ हजार रुपये अनुदान वाटप केले जाते. परंतु या वर्षी या अनुदानाचे वाटप झालेले नाही, महापालिकेने कोणतीही सबब पुढे न करता दिवाळी सणा अगोदर या दिव्यांग बांधवांना अनुदानाचे वाटप केलेच पाहिजे, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेकडे आग्रही मागणी केलेली आहे, तसेच दिव्यांगांना महापालिका आवारात त्यांच्या ३ चाकी सायकली उभ्या करण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी,त्यांना मुख्य गेट वरून कार्यालयात घेऊन जाण्यासाठी एका कर्मचाऱ्याची नेमणूक करावी अशीही न्याय्य मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांनी उल्हासनगर महापालिका प्रशासनाकडे केलेली आहे .
मनसेच्या  मागणीची दखल न घेतल्यास महापालिकेच्या प्रांगणात आंदोलनाचा इशारा मनसेने दिलेला आहे.
यावेळी उप-जिल्हा सचिव संजय घुगे,कामगार सेनेचे दिलीप थोरात, शहर संघटक मैनुद्दीन शेख उपस्थित होते.

Google Ad
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close