बोगस फायनान्स माफियाची गोरगरीब शेतकरी व वाहनधारकांना मा.उच्च न्यायालयाचा धाक दाखवून गुंडांमार्फत करोडोंची वसूली !!!

बोगस फायनान्स माफियाची गोरगरीब शेतकरी व वाहनधारकांना मा.उच्च न्यायालयाचा धाक दाखवून गुंडांमार्फत करोडोंची वसूली !!!
बीड , मुनीर खान : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात काही प्रायव्हेट फायनान्स कडून गोरगरीब शेतकर्यांची व वाहनधारकांना वेठीस धरून तसेच मा.उच्च न्यायालयाचा धाक दाखवून सक्तीने वसूली होत असल्याची माहिती महाराष्ट्र तेज न्युजचे प्रतिनिधी मुनीर खान यांना प्राप्त झाली तेव्हा त्यांनी ह्या सर्व प्रकरणाची संबंधीत ग्राहकांना भेटून चौकशी केली असता असे निदर्शनास आले की समर्थ वाहन बाजार चे मालक अच्युत नारायणराव लिंगायत हे काही वर्षांपूर्वी स्टेट बेंकेत एक सामान्य कारकून होते व वडिलोपार्जित फक्त सात एकर जमीन होती व दोघे भाऊ एका दहा पत्र्याच्या घरात साधारण आयुष्य जगत होते . आज तेच अच्युत लिंगायत नौकरी चा राजिनामा देऊन कोट्याधीश कसे झाले हा तपासाचा विषय आहे .
तसेच समर्थ वाहन बाजार ही फायनान्स कंपनी श्रीराम फायनान्स शी सलग्न असल्याचे सगळ्यांना सांगत व मा. उच्च न्यायालयाचा धाक दाखवून सक्तीची वसूली करत आहेत व ज्यांची वसूली होत नाही त्यांचे ट्रेक्टर व वाहने जबरदस्तीने ओढून नेऊन स्वतःच्या खाजगी जागेत जमा करत आहेत व तेथे काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना राखण्यासाठी ठेवले आहे .
संबंधीत ग्राहकांनी व मुनीर खान ह्यांनी आयकर विभागाला व पोलीस प्रशासनाला पत्र लिहून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची व अच्युत लिंगायत कडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती कुठून आली ह्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे .