उल्हासनगर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेने मध्ये मालवाहतूक वाहन चालकांचा जाहीर प्रवेश….

उल्हासनगर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेने मध्ये मालवाहतूक वाहन चालकांचा जाहीर प्रवेश….
उल्हासनगर , शरद घुडे : महाराष्ट्रातील जनसामान्यांचा बुलंद आवाज आणि आधारस्तंभ असलेले माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे अध्यक्ष माननीय श्री संजयजी नाईक साहेब, आरिफ भाई शेख, मनसे नेते तथा आमदार माननीय श्री राजू दादा पाटील, जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उल्हासनगर वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष श्री काळू थोरात यांच्या उपस्थितीत आणि उल्हासनगर मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन भाई शेख यांच्या नेतृत्वाखाली आज उल्हासनगर-२ नेहरू चौक येथील वाहतूक रिक्षा चालकांनी उत्स्फूर्तपणे महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेने मध्ये प्रवेश केला, यावेळी त्यांचा स्टॅण्ड चा प्रश्न, व्यापाऱ्यांकडून होणारा त्रास अश्या काही समस्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडल्या वाहन चालकांना येणाऱ्या अडचणी, त्यांच्या समस्या वाहतूक शाखेतील अधिकाऱ्यांच्या कानावर घालून त्या सोडविण्याचा मनसे तर्फे प्रयत्न करणार असल्याचे शहर संघटक मैनुद्दीन भाई शेख यांनी सांगितले.
यावेळी शहर संघटक मैनुद्दीन भाई शेख, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष श्री.काळू थोरात, उप-शहर अध्यक्ष शैलेश पांडव, सुभाष हटकर, विभाग अध्यक्ष बादशहा शेख, वाहतूक सेनेचे राहुल वाकेकर, महेश साबळे, संतोष खत्रे तसेच मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.