Breaking Newsनाशिक

मराठा समाजासाठी पहिला वार छातीवर घेण्यास तयार –  खा.संभाजी राजे

मराठा समाजासाठी पहिला वार छातीवर घेण्यास तयार –  खा.संभाजी राजे
मराठा क्रांती मोर्चाची दिशा निर्णायक वळणावरः पुन्हा धगधगणार क्रांतीची मशाल

 

नाशिक/प्रतिनिधी
मराठा समाजाचा नेता म्हणून नाही तर छञपतींचा मावळा म्हणून मराठा क्रांती मोर्चाच्या कुठल्याही मोहीमेवर मी समाजासोबत आहे. कुठलाही पहिला वार माझ्या छातीवर होऊ द्या . मी कुणालाही भिक घालणार नाही. अशा शब्दात छञपती खा.संभाजी राजे भोसले यांनी नाशिकमध्ये पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत समाजाला आश्वासीत केले.

विद्यमान परिस्थितीत आरक्षणाबाबत मराठा समाजात निर्माण झालेले समज गैरसमज, भरकटत जाणारे मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन यावर मार्ग काढून मराठा आंदोलनाला  निर्णायक दिशा देण्यासाठी नाशिकमध्ये राज्यस्तरीय समन्वयकांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीला मार्गदर्शन करतांना छञपती खा.संभाजी राजे भोसले बोलत होते.

साधारण १२ वा.दरम्यान खा.संभाजीराजे भोसले यांचे बैठकस्थळी आगमन झाल्यानंतर त्यांच्या हस्ते छञपती शिवाजी महाराजांच्या पुष्पमाला अर्पण करून पुजन झाल्यानंतर १३० किलो वजनाच्या २० फुट तलवारीचे अनावरण करण्यात येऊन बैठक सुरू झाली. अगदी सुरूवातीलाच बैठकीचा हेतू विषद करून करण गायकर  यांनी प्रास्ताविक केले.

अॕड.तांबे यांनी सामाजिक आरक्षणाविषयी आजपर्यंत घडलेल्या घडामोडींचा उहापोह करतांना मंडल आयोगाने केलेली मराठा समाज पुढारलेला आहे ही शिफारस धादांत खोटी आणि वस्तुस्थिती नाकारणारी असल्याचे सोदाहरण स्पष्ट केले.तर सर्वोच्च न्यायालयात काम करणारे अॕड.श्रीराम पिंगळे यांनी मराठा आरक्षणाची मुद्देसुद व्यथा मांडली.एसइबीसी प्रवर्गाचे आरक्षण सुरक्षीत करायचे असेल तर राज्यपालांमार्फत हा प्रवर्ग राष्ट्रपतींना नोटीफाय करण्याची विनंती,घटना दुरूस्ती करून आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा रद्द करण्यासाठी केंद्र सरकारवर आंदोलनाच्या माध्यमातून अथवा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून दबाव आणणे यांसारखे काही पर्याय सुचवले.
संजीव भोर  यांनी आरक्षणासोबत अन्य मागण्या विशेषतः अॕट्रोसीटीबाबत समाजाने राहावे,आंदोलनाने प्रश्न सुटतात हे मान्य असले तरी आंदोलनामुळे मराठा समाजातील तरूण पिढी उध्वस्त होणार नाही अशी आंदोलनाची दिशा ठरवावी अशी सुचना केली.
नाशिकच्या वतीने सुनील बागूल यांनी छञपती संभाजी राजे  यांच्या नेेतृत्वाखाली  महाराष्ट्रातील ४८ खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन आरक्षणाचा मुद्दा निकाली काढावा,विविध विषय समित्या नियुक्त कराव्यात.. आंदोलनासाठी खर्चाची जबाबदारी नाशिक जिल्हा स्वीकारण्यास तयार आहे,तर अॕड.शिवाजी सहाणे यांनी मराठा समाजाचे नेतृत्वव छञपती खा.संभाजी राजे यांनी स्वीकारण्याची सुचना जिल्ह्याच्या वतीने मांडली.
ना.नरेंद्र पाटील यांनी सरकार कुणाचेही असो आंदोलनाची तलवार म्यान करायची नाही.ओबीसी समाजाच्या मराठा समाजाला आरक्षण नको, अशा सुचना करून महाविकास आघाडी सरकारने आर्थिक विकास महामंडळाला एक छदामही दिला नसल्याची खंत व्यक्त केली. राजेंद्र कोंढरे, विरेंद्र पवार,किशोर चव्हाण,लाठे पाटील यांच्यासह या बैठकीत जवळपास अठ्ठावीस जिल्ह्यातील समन्वयकांनी आपली भुमिका मांडली.
बैठकीचा समारोप करतांना छञपती खा.संभाजी राजे भोसले यांनी समाज जी जबाबदारी देईल प्रामाणिकपणे पार पाडणार असल्याचे स्पष्ट केले. मी मराठाच नाही बहुजन समाजासाठी काम करतो.आठरा पगड बारा बलूतेदारांचे स्वराज्य निर्माण केलेल्या छञपती घराण्याचा वंशज म्हणून या वारशाला धक्का लागेल असे कृत्य मी करणार नाही.सातारा असो की कोल्हापूर दोन्ही घराणे,एकच आहेत.छञपती घराण्यात भांडणे लावण्याची कागाळी कुणी करीत असेल त्याच्या नांग्या ठेचाव्या लागतील अशा इशारा छञपतींनी यावेळी दिला.बैठकीचे सर्व सुञ संचालन तुषार जगताप यांनी केले.

 

उदयनराजेंचा संदेश

छञपती खा.उदयनराजे भोसले यांच्या काकूंचा दशक्रीया विधी असल्याने ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.माञ त्यांना बैठकीसाठी पाठवलेला संदेश त्यांचे भाचे जयेशराजे पवार यांनी वाचून दाखविला.आता बस्स झाले.आत थांबणे नाही.असा या संदेशाचा आशय होता.

बैठकीच्या शेवटी महाराष्ट्रात काही ठिकाणी येत्या १० आॕक्टोबरला काही उत्साही मंडळींनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.या आंदोलनाशी सकल महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चाच कुठलाही संबंध नाही असा ठरावा नाशिकच्या राज्यस्तरीय बैठकीत संमत झाल्याचे करण गायकर यांनी सांगीतले.

 

ठराव

लक्षवेधी ठरावः इडब्लूएसमध्ये आरक्षण नको

प्रत्येक ग्रामपंचायत मार्फत मराठा क्रांती मोर्चाने अधिकृतरित्या दिलेले निवेदन जिल्हाधिकारी (शासन) यांना द्यावे.

* येत्या २ आॕक्टोबरला खासदार आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन करणे..

* मराठा क्रांती मोर्चातील तरूणांवरा दाखल असलेले सर्व गुन्हे सरकसकट मागे घेणे..
सन २०१९ मध्ये एमपीएससी मध्ये निवड झालेल्या मराठा उमेदवारांची निवड संरक्षित करणे

*अतिवृष्टीमुळे फळबागेचे प्रचंड नुकसान झाले आहे.त्याची नुकसान भरपाई म्हणून हेक्री १लाख व इतरा पिकांसाठी ६० हजार रूपये भरपाई..
केंद्र सरकारने मराठा आरक्षण स्थगितीची दखल न घेतल्यास दिल्लीवर क्रांती मोर्चा,.

*येत्या पाच आॕक्टोबरला महाराष्ट्रातील प्रत्येक तहसिल ,जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणे.

*सारथी संस्थेच्या अध्यक्षपदी छञपती संभाजी राजे यांची नियुक्ती करावी,सारथीला एक हजार कोटीचा निधी द्यावा..

*राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शैक्षणिक संस्थामध्ये मराठा समाजासाठी १२% जागा वाढवून त्यासाठी आर्थिक तरतूद करावी..

* सर्व स्तरातून येणाऱ्या निवेदनाचा मसूदा एकसारखा असावा..

*प्रत्येक विषयासाठी अभ्यास तज्ञांची विषयानुरूप वेगवेगळी समिती स्थापन करावी..

* राज्य शासनाने राज्यपालांमार्फत राष्ट्रपतींकडे एसइबीसी प्रवर्ग १०२ घटनादुरूस्तीनुसार नोटीफाय करण्यासाठीचा प्रस्ताव पाठवावा..

* राज्यशासनाने केंद्रशासनाला राज्यघटनेमध्ये दुरूस्ती करून पन्नास टक्क्यांची मर्यादा रद्द/ संपविण्यासाठी करण्यासाठी विनंती प्रस्ताव पाठवावा.”

* राज्य सरकारने आरक्षणावरील स्थगिती उठेपर्यंत वाढीव जागांची तरतूद(सुपर न्युमररी) करून आर्थिक तरतूद करावी

*सर्वोच्च न्यायालयात सरकारची बाजू मांडणाऱ्या जेष्ठ वकीलांना ब्रिफींग करण्यासाठी सुचवलेल्या वकीलांची समिती तात्काळ गठीत करण्यात यावी.

*आरक्षणाचा प्रश्न घटना दुरूस्तीमुळे सुटणार असल्याने केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी दिल्लीमध्ये मराठा क्रांती मोर्चा आयोजीत केला पाहीजे.

* ज्या योजनांबाबत सरकारने घोषणा केल्या आहेत.त्यांची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहीजे..

* आठ ते दहा लोकांची समिती नियुक्त करून त्या समितीलाच शासन प्रशासनाशी चर्चा करण्याचे अधिकार द्यावेत..

*मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत,आंदोलनाबाबत माध्यमांना माहीती देण्यासाठी अधिकृत अभ्यासू प्रवक्ते नियुक्त करावेत..त्यांनीच माध्यमांशी संवाद करावा.

* मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फीची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारावी.

*भविष्यातील कुठलेही आंदोलन शांततेच्या मार्गाने व्हावे.मराठा क्रांती मोर्चाची परंपरा कायम राखावी..

*कुठल्याही मागास वर्ग समाजाच्या विरोधात क्रांती मोर्चा जाणार नाही..

* आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयीन लढ्यात सरकारची पर्यायाने समाजाची बाजू मांडण्यास अपयशी ठरलेले महाअधिवक्ता कुंभकोणी यांचे अधिकार काढून घ्यावेत..

*महाराष्ट्रात १० आॕक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनाशी महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चाचा कुठलाही संबंध नाही .

Google Ad
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close