अमरावती

आता तालुका पातळीवरील पत्रकारांना मिळणार अधिस्विकृती पत्र – विलास मराठे

आता तालुका पातळीवरील पत्रकारांना मिळणार अधिस्विकृती पत्र – विलास मराठे

पद्मभुषण डॉ. विजय भटकर यांच्या वाढदिवसानिमित्य अभिष्टचिंतन सोहळा

अ. भा. ग्रा. पत्रकार संघाचे आयोजन

पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

चांदूर रेल्वे – (शहजाद खान)
ग्रामीण पत्रकारांनाही न्याय मिळावा यासाठी राज्याच्या कृती समितीच्या बैठकीतुन तालुका प्रतिनिधी यांनाही अधिस्विकृती देण्यात येणार असल्याचा निर्णय झाला आहे. अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघ ग्रामिण पत्रकारांच्या समस्यांबाबत पाठपुरावा करीत असुन या संघटनेच्या पाठिशी आम्ही वृत्तपत्र मालक आहो असे मत दैनिक हिंदुस्थानचे संपादक विलास मराठे यांनी व्यक्त केले. ते अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असुन यात महासंगणक जनक पद्मभुषण डॉ. विजय भटकर यांच्या वाढदिवसानिमित्य आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यात बोलत होते.

 

अमरावती येथील मनवार हॉटेलमध्ये रविवारी अ. भा. ग्रा. पत्रकार संघाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक हिंदुस्थानचे संपादक विलास मराठे, दैनिक विदर्भ मतदारचे कार्यकारी संपादक सनद ओहाळे, प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख, केंद्रीय उपाध्यक्ष युसूफ खान, ज्ञानेश्वर बोराळकर, महासचिव सुरेश सवळे, मानद सचिव अशोक पवार, केंद्रीय कार्यकारीणी सदस्य बाबाराव खडसे, विदर्भ अध्यक्ष संजय कदम, राज्य उपाध्यक्ष संजय पोफळे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात महासंगणक जनक पद्मभुषण डॉ. विजय भटकर यांच्या परिवारातील दिनेश भटकर, अनुप भटकर, मिनल भटकर यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच देशातील वृत्तपत्र मालकांची सर्वोच्च संस्था इंडियन न्यूजपेपर सोसायटी मध्ये सलग १८ व्यांदा अविरोध निवड झाल्याबद्दल विलास मराठे यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय एएस न्युजचे संपादक अनिल साखरकर, सहसंपादक राजू शिवणकर व कोरोना योद्ध्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. या दरम्यान संघटनेचे एबीपी उन्नत टीव्ही या वेब पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला . सदर वेबपोर्टकरीता जिल्हा सचिव सचिन ढोके यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच या पत्रकार संघाला २५ वर्षपुर्ण होत असल्याने “भरारी” नावाची स्मरणीका काढण्यात येणार असुन याच्या कव्हरपेजचे विमोचन सुध्दा करण्यात आले .

 

यानंतर प्रास्ताविकपर भाषणातुन प्रदेशाध्यक्ष कैलासबापू देशमुख यांनी अ. भा. ग्रा. पत्रकार संघाची महाराष्ट्रात २२ जिल्ह्यात घोडदौड सुरू असतांना आता राजस्थान, गुजरात व मध्यप्रदेश या तीन राज्यात सुद्धा संघटनेचे काम सुरू झाल्याची माहिती दिली. तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सनद आहाळे यांनी यावेळी आपल्या भाषणातून म्हटले की, ग्रामीण पत्रकारांच्या खूप समस्या आहे. पत्रकारिता करतांना ग्रामीण भागातील राजकीय पदाधिकाऱ्यांपासून व समाजातील लोकांकडून उपेक्षा तथा त्रास सहन करावा लागतो. तरीही अशा परिस्थितीत ग्रामीण भागात राहून पत्रकारिता करतांना यांची दखल घेतली जावी म्हणून सदर पत्रकार संघ स्थापन करून त्यांच्यासाठी प्रयत्न करत आहे हे गौरवास्पद आहे. तसेच अमरावती जिल्ह्यातून पत्रकार संघ स्थापन करून पत्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले व आता महाराष्ट्रासह इतर तीन राज्यात काम सुरू आहे हे अभिमानास्पद आहे असेही ते म्हणाले. तर अध्यक्षीय भाषणातून संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने यांनी सांगितले की, ग्रामीण भागात वार्तांकन करतांना त्याचा मोबदला मिळत नाही. कलावंतांना ज्याप्रमाणे मानधन दिले जाते त्याप्रमाणे पत्रकारांनाही मानधन मिळावे या शासन दरबारी नोंद घेऊन मानधन देण्यात यावे यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तसेच या पत्रकार संघटनेने ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती देण्याबाबत पाठपुरावा केला असून याला लवकरच यश मिळणार असल्याचे म्हटले. ग्रामीण पत्रकारांवर अन्याय अन्याय होतो, अडचणी येतात तेव्हा हा पत्रकार संघ नेहमी पाठीशी उभा असतो. कोरोना काळात वृत्तपत्र बंद झाले असतांना आमच्या आंदोलनाची दखल घेत पुन्हा वृत्तपत्र पूर्ववत सुरू झाल्याचे मनोहरराव सुने यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन केंद्रीय कोषाध्यक्ष अशोक याऊल यांनी केले. कोरोना महामारीच्या काळात कोरोना योध्दा म्हणून काम करतांना शहिद झालेल्या पत्रकारांना अ.भा.ग्रा.पत्रकार संघाच्या वतीने दोन मिनिट मौन पाळुन श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी प्रदेश सरचिटणीस प्रा. रवींद्र मेंढे, विदर्भ कार्यकारीणीचे बाळासाहेब सोरगिवकर, मधुकरराव चरपे, माणिकराव ठाकरे, जिल्हाध्यक्ष प्रदीप जोशी, अनंत बोबडे यांसह अमरावती विभागातील पत्रकारांची उपस्थिती होती. यादरम्यान कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.

Google Ad
Tags
Back to top button
Close
Close