तिने विनयभंगाचा विरोध केला त्या वासनांधाने अमानुषपणे फोडले तिचे डोळे !!!

तिने विनयभंगाचा विरोध केला त्या वासनांधाने अमानुषपणे फोडले तिचे डोळे !!!
पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील न्हावरे गावात एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे . नैसर्गिक विधीसाठी गेलेल्या महिलेचा एका अज्ञात आरोपीने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्याला विरोध केला असता त्याने तिला जबर मारहाण केली आणि या मारहाणीत महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत.
शिरूर तालुक्यात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही ३७ वर्षाची आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास ती घराशेजारी नैसर्गिक विधीसाठी गेली होती. त्याचवेळी जवळच्या झुडपात दबा धरून बसलेल्या एका अज्ञात व्यक्तीने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला असता महिलेने त्याला विरोध केल्याने चिडून त्याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. या अमानुष हल्ल्यात तिचे दोन्ही डोळे निकामी झाले आहेत.
दरम्यान, या घटनेने शिरूर तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पीडित महिलेवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिरूर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून आरोपीविरोधात विनयभंगाचा आणि प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेवर झालेला हा जीवघेणा हल्ला कोणी आणि कशासाठी केला, याचा तपास शिरूर पोलीस करीत आहेत.