उल्हासनगर

महानगर पालिकेच्या मालकीची परंतु सध्या स्थानिक स्वयंघोषित पुढाऱ्यांच्या ताब्यात असलेली समाजमंदिरे मालमत्ता विभागाने तात्काळ ताब्यात घ्यावी – मनसे

महानगर पालिकेच्या मालकीची परंतु सध्या स्थानिक स्वयंघोषित पुढाऱ्यांच्या ताब्यात असलेली समाजमंदिरे मालमत्ता विभागाने तात्काळ ताब्यात घ्यावी – मनसे.

उल्हासनगर  : उल्हासनगर शहरातील उल्हासनगर महानगर पालिकेच्या मालकीची असलेली आणि लाखों रुपये खर्च करून बांधलेली समाजमंदिरे ही स्थानिक लोकप्रतिनिधी, लोकप्रतिनिधींचे हस्तक, स्थानिक स्वयंघोषित पुढारी यांच्या ताब्यात असल्याने परिसरातील जनसामान्यांना या समाजमंदिरांचा कसलाच उपयोग होत नाही, फायदा घेता येत नाही.

उल्हासनगर शहरात महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या मालमत्तांचा असाच दुरुपयोग सध्या शहरात सगळीकडेच सुरू आहे, महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या शाळा, शौचालये, समाजमंदिरे, खेळांची मैदाने, उद्याने यांची कसलीच निगा आणि काळजी मालमत्ता विभागाकडून घेतली जात नसल्याने त्या ठिकाणी भूमाफिया यांनी अवैध ताबा घेतलेला आहे,कित्येक शौचालये हडप करण्यात आलेली आहेत, मैदानांवर अतिक्रमण झालेले आहे, खोटी कागदपत्रे बनवून महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या शाळेची जागा हडप करण्याचे प्रयत्न काही लोकांकडून सुरू आहेत परंतु उल्हासनगर महानगर पालिकेच्या मालमत्ता विभागाला याचे काहीच देणे घेणे नाही, आणि मालमत्ता विभाग अतिशय निवांत पणे गाढ झोपी गेलेला आहे. आठवड्याभरात शहरातील ही समाजमंदिरे महापालिकेच्या ताब्यात न घेतल्यास मालमत्ता विभागाच्या कार्यालयाबाहेर मनसे तर्फे ठिय्या आंदोलन केले जाईल, आणि मालमत्ता विभागाचा अनेक विषयांबाबतीत असलेला भ्रष्ट आणि गैर-कारभार चव्हाट्यावर आणला जाईल असा मनसेने ईशारा दिलेला आहे आणि अश्या आशयाचे निवेदन ही आज मालमत्ता विभाग आणि आयुक्तांना दिलेले आहे.

यावेळी शहर संघटक मैनुद्दीन भाई शेख, उप-शहर अध्यक्ष सुभाष हटकर, वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात,विभाग अध्यक्ष बादशहा शेख, उप-विभाग अध्यक्ष विष्णू जाधव, विध्यार्थी सेनेचे उप-शहर अध्यक्ष विजय पवार, महेश साबळे, शुभम कांबळे,संतोष खत्रे आणि मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Google Ad
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close