बुलढाणा

राज्यात दलित महिलांवरील वाढत्या अत्याचाराला राज्य सरकार जबाबदार – सर्जेराव जाधव

राज्यात दलित महिलांवरील वाढत्या अत्याचाराला राज्य सरकार जबाबदार – सर्जेराव जाधव

बुलढाणा , रवींद्र वाघ : सद्या महाराष्ट्र राज्यात दलित महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे .
बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील रणांत्री गावातील बौद्ध समाजातील तरुणी सुजाता समाधान खरात वय 24 वर्षे हिला सिम कार्ड देण्याच्या बहाण्याने बोलावून रताळी येथील नराधमाने निर्घृण खून केल्याची घटना 02/10/2020 रोजी घडली असून 5 तारखेला साखरखेडा पोलीस ठाण्यात मिसिंग केस दाखल करण्यात आली व त्यानंतर 18 तारखेला छिन्नविच्छिन्न मृतदेह गावाजवळील शेतामध्ये आढळून आला . मृतदेहाची अवस्था अत्यंत विदारक होती मुंडके एकीकडे तर धड एकीकडे व कुजलेले होते .

तसेच जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पानेगाव येथील बेबी विठ्ठल तुपसुंदर ह्या 30 वर्षिय मुलीचा घरी परत जात असताना खून करण्यात आला होता , त्याच पाठोपाठ बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साळेगाव येथील 28 वर्षिय आश्विनी इंगळे ही दि.30 रोजी कापूस वेचणीसाठी शेतात गेली असताना तिचा खून करण्यात आला .या आघाडी सरकारच्या काळात अनेक ठिकाणी महिलांवरील अत्याचार वाढले आहेत पण हे सरकार दलित महिलांचे रक्षण करण्यात अपयशी ठरत आहे हे सिद्ध झाले आहे असे भाजप आ.जा.मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी सांगितले .
ते पुढे म्हणाले की या तिन्ही जिल्ह्यातील मयत मुलींच्या कुटुंबात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे व ह्या व्यक्तींचे पुनर्वसन करून प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत करावी अन्यथा आघाडी सरकारच्या विरोधात तिव्र आंदोलन करण्यात येईल याची शासनाने दखल घ्यावी .
सर्जेराव जाधव यांनी मयत सुजाता खरात चे वडील समाधान खरात यांची भेट घेऊन खरात कुटुंबाचे सांत्वन केले तसेच चिखली मतदार संघाच्या आमदार स्वेता ताई महाले यांनी ही यावेळी भ्रमणध्वनी वरून ह्या कुटुंबाची विचारपूस करून शोक व्यक्त केला .
सर्जेराव जाधव पत्रकारांशी बोलताना म्हणाले की पालक मंत्री यांच्या गावापासून अवघ्या 14 किलोमीटरवर सुजाता हिचा खून झाला पण पालकमंत्र्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केले आहे , आघाडी सरकारला फक्त मतदानाच्या वेळीच दलित दिसतात अशी खंत व्यक्त केली .
ह्यावेळी सरपंच जायभाये , बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष संतोष साळवे, अमोल जाधव, निलेश जाधव, प्रदीप जाधव, जाफराबाद तालुका अध्यक्ष संजय हिवाळे, रवी साबळे, संजय तोडे, मनिष तोडे, प्रकाश तोडे, विजय अंभोरे व जालना जिल्हा उपाध्यक्ष हरीश पाटोळे उपस्थित होते .

Google Ad
Tags
Back to top button
Close
Close